Vadgaon Maval : राज ठाकरे ईडी नोटीस प्रकरणी मावळ तालुका मनसे आक्रमक

एमपीसी न्यूज- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) नोटीस बजावण्यात आली आहे. 22 ऑगस्ट रोजी त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाच्या विरोधात मावळ तालुका मनसेच्या वतीने मावळ बंद करून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा मनसे तालुका अध्यक्ष रूपेश म्हाळसकर यांनी दिला आहे.

सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आवाज उठवला म्हणून राजकीय सूडबुद्धीने नोटीस बजावल्याचा आरोप म्हाळस्कर यांनी केला आहे. लोकसभा निवडणूक कालावधीत राजसाहेबांनी मोदी सरकारचा पर्दाफाश केला होता. मोदी, शहा यांच्या हुकूमशाही विरोधात ठामपणे उभे राहिल्यामुळेच ईडीने नोटीस बजावली आहे. असे म्हाळसकर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.