Pune : ‘श्यामरंग’मध्ये शुक्रवारी श्रीकृष्णाच्या रुपांवर कथक आणि शास्त्रीय रचनांचे सादरीकरण

एमपीसी न्यूज- ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त ‘श्यामरंग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कृष्णाच्या विविध रुपांवर आधारित कथक नृत्य आणि शास्त्रीय रचनांचे सादरीकरण या कार्यक्रमात केले जाणार आहे. ‘नृत्यवेध’ प्रस्तुत हा कार्यक्रम शुक्रवारी (दि. २३) संध्याकाळी ६ वाजता ‘भारतीय विद्या भवनमध्ये सादर होणार आहे अशी माहिती संस्थेचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.

या कार्यक्रमात डॉ माधुरी आपटे आणि त्यांच्या शिष्या श्रीकृष्णाच्या विविध रूपांचे कथकद्वारे सादरीकरण करणार आहेत. किशोरी जानोरकर या शास्त्रीय रचना सादर करणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.