Nigdi : वीरशैव लिंगायत समाजाचा स्नेहमेळावा उत्साहात

एमपीसी न्यूज – वीरशैव लिंगायत (माळी) समाज संघ पिंपरी-चिंचवड आणि पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेला वार्षिक स्नेहमेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. निगडी प्राधिकरण येथील महात्मा बसवेश्वर भवनात समारंभ झाला. कार्यक्रमात दत्तात्रय विष्णू माळी यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देण्यात आला.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक मल्लिनाथ हिरमुखे, मानव कांबळे उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष अप्पासाहेब वाले, कार्यवाह धोंडीराम माळी, खजिनदार शंकर कोरे, विनायक माळी, संतोष माळी, सुहास माळी, अनिल दामटे, डॉ. शिवराज म्हेत्रे, डॉ. शुभांगी म्हेत्रे, संजय माळी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात 105 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सात विद्यार्थ्यांना सात हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली. संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांना 80 हजार रुपयांचा मदतनिधी देण्यात आला. एस के माळी, बाळकृष्ण विसापुरे, एन एन माळी, पांडुरंग माळी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. विनायक माळी यांनी सूत्रसंचालन केले. तर धोंडीराम माळी यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2