India Corona Update : गेल्या 24 तासांत देशभरात 11,067 नवे रुग्ण, 94 मृत्यू 

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशभरात 11 हजार 067 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून, 94 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्याच्या घडीला 1 लाख 41 हजार 511 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

आरोग्य मंत्रालाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 08 लाख 58 हजार 371 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 05 लाख 61 हजार 608 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 13 हजार 087 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 20 कोटी 33 लाख 24 हजार 6550 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 7 लाख 36 हजार 903 नमून्यांची तपासणी मंगळवारी (दि.9) करण्यात आली आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात 94 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 55 हजार 252 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.43 टक्के एवढा आहे‌. तर, रिकव्हरी रेट 97.24 टक्के एवढा झाला आहे. देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली त्यापासून आतापर्यंत 66 लाख 11 हजार 561 जणांचे लसीकरण झाले आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.