Pune : युवक क्रांती दलातर्फे पूरग्रस्त भागात सफाई आणि मदत मोहीम

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र गांधी स्मारक निधी पुणे व युवक क्रांती दल यांच्यावतीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांना मदत पोहोचविण्याचे काम 9 ऑगस्ट पासून सुरू आहे .त्याचप्रमाणे स्थानिक युवकांच्या मदतीने साफसफाई काम जोरात चालू आहे. डॉ. प्रवीण सप्तर्षी, (उपाध्यक्ष ,युक्रांद ,महाराष्ट्र), सचिन पांडुळे (अध्यक्ष युवक क्रांती दल, पुणे शहर) यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

पुणे शहरात तसेच युवक क्रांती दलाच्या महाराष्ट्रभर असलेल्या भागातून पैसे, औषधे, कपडे, अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तू गोळा करण्याचे काम चालू आहे. त्यास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वस्तूंचे वाटप गरजुंपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यासाठी युवक क्रांती दलाच्या पुणे, अहमदनगर, सांगली, सातारा, धुळे, यवतमाळ, बुलढाणा या शाखांतून सुमारे पन्नास कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

त्यांनी अंकलखोप, कनेगाव, हरिपूर,मसुचीवाडी,बोरगाव, भरतवाडी, बहाद्दूरवाडी, सित्तुर, सांगलीवाडी, येलुर, बहे या सांगली जिल्ह्यातील गावांत मोठ्या प्रमाणात धान्य, कपडे, औषधे वाटण्याचे काम केले आहे. त्याचप्रमाणे स्थानिक युवकांच्या मदतीने साफसफाई काम जोरात चालू आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने चंदूर, मजरेवाडी, शिरोळ या गावीही मदतकार्य सुरू आहे. हे कार्य करत असताना असे निदर्शनास आले आहे की मदतीचा ओघ अतिशय चांगला असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांची संवेदनशीलता जागृत असल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणून तथापि मदत कार्य पोहोचविण्याबाबत गावांमध्ये रास्त पध्दतीने होत नसल्याचे दिसले. मुख्यत्वे करून नदीकाठी राहणारे वंचित समाजाच्या लोकांचे जीवन उध्वस्त होऊनही त्यांच्यापर्यंत मदत पोहोचत नाही. म्हणूनच युवक क्रांती दलाने पुराचा तडाखा जास्त बसलेल्या दलित वस्त्यांमध्ये शक्य तेवढा प्रयत्न केला.

अजूनही मोठ्या प्रमाणात आर्थिक व वस्तुरूपाने मदतीची गरज आहे. त्याबरोबरच आमच्या टिमबरोबर काम करणाऱ्या कार्यकर्त्याबरोबर आणखी युवकांची गरज आहे. तरी या कामासाठी अन्नदान, अर्थदान, समयदान देऊन शेतकरी, कष्टकरी यांच्या पुनर्वसन साठी सर्वांनी हातभार लावावा असे कळकळीचे आवाहन युवक क्रांती दलाने केले आहे .

अप्पा अनारसे, रवी लाटे, युवराज मगदुम, संगीता माने, ऋतुजा पुकाळे, अभिजीत मंगल, विजय पाटील, तुषार झरेकर, सारिका सोकटे, प्रतिभा कदम, अक्षय पाटील, महेश पवार, ऍड. संदीप मेहेत्रे,महावीर जाधव,मनीषा काटे असे अनेक कार्यकर्ते या मदत मोहिमेत सहभागी झाले आहेत .

तसेच पुढील टप्प्यात विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप करायचे असून त्यासाठी आपल्या मदतीची गरज आहे वस्तूमध्ये वह्या,कंपास, ,दप्तर, पेन, पेन्सिल, चित्रकला वही, टिफिन बॉक्स, शाळेसाठी फळा, डस्टर, कचरा पेटी, टेबल, खुर्ची,फोल्डर या वस्तूंची गरज आहे. संपर्कासाठी सचिन पांडुळे 9096313022 यांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.