Akurdi: टोळक्याचा धुडगूस, 22 वाहनांची तोडफोड 

एमपीसी न्यूज – आकुर्डी परिसरात शुक्रवारी मध्यरात्री सात ते आठ जणांच्या टोळक्याने धुडगूस घालत वाहनांची तोडफोड केली. टोळक्याने आकुर्डी गावठाणातील महादेव मंदिर परिसरातील घरासमोर उभ्या केलेल्या तब्बल 22 वाहनांची लाकडी दांडके, दगडांनी तोडफोड केली. रात्री दोनच्या सुमारास हा प्रकार घडला.

आकुर्डी गावठाणातील महादेव मंदिर परिसरातील नागरिकांनी शुक्रवारी घरासमोर वाहने उभी केली होती. मध्यरात्री दोनच्या सुमारास सात ते आठ जणांच्या टोळक्याने धुडगूस घालत वाहनांची तोडफोड केली. त्यामध्ये सर्व महागड्या चारचाकी गाड्यांची तोडफोड झाली आहे. लाकडी दांडके, दगडांनी तोडफोड करण्यात आली आहे.

याबाबत अद्याप कोणतीही माहिती नसल्याचे निगडी पोलिसांनी सांगितले. मध्यरात्री टोळक्याने धुडगूस घालत 22 वाहनांची तोडफोड केली. तरी, देखील पोलिसांना अद्याप याची कोणतीही खबर नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात वाहनांच्या तोडफोडीचे सत्र काही केल्या थांबत नाही.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.