Nigdi : राष्ट्रभक्ती समूह गायन स्पर्धेत मॉडर्न विद्यालयाचा प्रथम क्रमांक

एमपीसी न्यूज – विवेकानंद केंद्र चिंचवड शाखेच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रभक्ती समूह गायन स्पर्धेत मोठ्या गटात यमुनानगर निगडी येथील मॉडर्न विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला.

चिंचवड येथील मोरे सभागृहात ही स्पर्धा झाली. यावेळी मॉडर्नच्या संघाने कारगिल युद्धावरील समूहगीत सादर केले. प्रथम क्रमांक आलेल्या विजयी संघास स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक व पुस्तक भेट देण्यात आले. समूहगीत गायन स्पर्धेत हार्मोनियमवर लिखित निकम तर तबल्यावर वेदांत पदोळ यांनी उत्तम साथ दिली.

यशस्वी विद्यार्थ्यांना संगीत शिक्षक अमोल साठे यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक मुख्याध्यापक सतीश गवळी, संस्थेचे उपकार्यवाह शरद इनामदार, कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, सहकार्यवाह प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.