BNR-HDR-TOP-Mobile

Dehuroad : राहत्या घरातून मुलगा बेपत्ता

एमपीसी न्यूज – घरातील सर्वजण झोपल्यानंतर पहाटे मुलाने घर सोडले. ही घटना गुरुवारी (दि. 22) पहाटे विकासनगर, देहूरोड येथे घडली.

कैफ दिलशाद काझी (वय 17) असे घरातून निघून गेलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी मामा मोहसीन हशम पटेल (वय 34) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहसीन पत्नी आणि दोन मुलांसह विकासनगर येथे राहतात. त्यांच्या सोबत त्यांचा भाचा कैफ देखील राहतो. तो इयत्ता नववी मध्ये शिकत आहे. बुधवारी रात्री सर्वजण जेवण करून झोपले. रात्री सर्वजण झोपल्यानंतर कैफ घरातून निघून गेला. मोहसीन गुरुवारी पहाटे सहाच्या सुमारास झोपेतून उठले असता कैफ घरामध्ये नसल्याचे दिसले. त्यांनी दिवसभर सर्वत्र शोध घेतला. मात्र कैफ सापडला नाही.

रंग गोरा, नाक सरळ, उंची पाच फूट आठ इंच, अंगावर पांढरा शर्ट, जीन्स पॅन्ट घातली आहे. मराठी, हिंदी भाषा बोलतो. वरील वर्णनाचा मुलगा कुठे आढळून आल्यास अथवा त्याबाबत काही माहिती मिळाल्यास देहूरोड पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

HB_POST_END_FTR-A2

.