Vadgaon Maval : जांभुळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मनीषा गणेश लालगुडे

एमपीसी न्यूज- जांभुळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मनीषा गणेश लालगुडे यांची बिनविरोध निवड झाली. लालगुडे यांच्या रूपाने गेल्या 70 वर्षात सांगवी गावाला प्रथमच सरपंचपदाची संधी मिळाली आहे.

सरपंच अश्विनी ओव्हाळ यांनी कार्यकाळ संपल्याने राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी मंगळवारी (दि. २७) निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. लालगुडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एम व्ही खोमणे यांनी जाहीर केले. सहायक म्हणून तलाठी एस एस निंबाळकर, ग्रामसेवक आर टी कारंडे यांनी काम पाहिले. यावेळी उपसरपंच अंकुश काकरे, सदस्य चंद्रकांत ओव्हाळ, दत्तात्रय जांभुळकर, शाम पवार, रखाबाई भोईर, नंदा गराडे, उपस्थित होते. निवडीनंतर उपसरपंच अंकुश काकरे, माजी उपसरपंच काशिनाथ तोडकर आदी मान्यवरांच्या हस्ते लालगुडे यांचा सत्कार करण्यात आला.

सांगवी गाव हे पुर्वीच्या कान्हे ग्रामपंचायतीच्या व आताच्या जांभूळ ग्रामपंचायमध्ये समाविष्ट असून यापूर्वी सांगवीला उपसरपंच पदाची संधी मिळालेली होती. परंतु लालगुडे यांच्या रूपाने गेल्या 70 वर्षात सांगवी गावाला प्रथमच सरपंचपदाची संधी मिळाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.