Pune : गणेश प्रतिमा, कलावस्तूचे गुरुवार पासून  ‘ट्राईब छत्री ‘ कलादालनात  प्रदर्शन 

एमपीसी न्यूज – भारतातील आदिवासी आणि ग्रामीण कलाकार निर्मित  गणेश प्रतिमा ,कलावस्तूचे प्रदर्शन ‘ ट्राईब   छत्री ‘ कलादालनात गुरुवार (दि. 29) ऑगस्टपासून  भरविण्यात येणार आहे. पर्वती पायथा महिला मंडळ येथे असलेल्या ‘ट्राईब छत्री’ कलादालनाच्या संचालिका पूर्वा परांजपे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. 

भारतातील विविध भागांतील गणपती प्रतिमा आणि त्याच्याशी निगडित कलाकुसरीच्या वस्तू, भेट वस्तू , सजावटीसाठीच्या  वस्तू हे सर्व एका ठिकाणी  पाहता येणार आहेत . राजस्थानातील टेराकोटा च्या गणेशमूर्ती ,ओडिशातील आदिवासींनी तयार केलेली पाम वृक्षापासून केलेले गणेश प्रतिमा रंगविलेले बुक मार्क ,राजस्थानातील आदिवासींनी केलेले धातूंच्या सफेत गणेशमूर्ती ,पट्ट चित्र प्रकारातील गणेश प्रतिमांचे पेंटिंग ,पश्चिम बंगाल च्या कलाकारांनी कागद आणि ज्यूट(ताग ) पासून केलेल्या गणेश प्रतिमांच्या कलावस्तू  हे या प्रदर्शनाचे आकर्षण आहे .

29 ऑगस्ट पासून अनंत चतुर्दशी 12सप्टेंबर पर्यंत हे प्रदर्शन पाहता येणार  आहे. सकाळी 11 ते रात्री 8 अशी या प्रदर्शनाची वेळ आहे. प्रवेश विनामूल्य आहे, मात्र कलावस्तू हव्या असल्यास त्या थेट कलाकारांकडून विक्रीस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ट्राइब छत्री ‘ हे केंद्र शासन मान्यताप्राप्त आदिवासी कलावस्तू दालन आहे .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.