Talegaon Dabhade : आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत रमेश कुमार साहनी इंग्लिश मिडीयम स्कूलची चमकदार कामगिरी

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा कार्यालय व राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय कबड्डी स्पर्धेमध्ये रमेश कुमार साहनी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवले.

या स्पर्धेमध्ये एकूण 140 संघांनी सहभाग घेतला. ही स्पर्धा सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल येथे पार पडली. या स्पर्धेचे उदघाटन मुख्याध्यापिका वैशाली बोंद्रे व सविता खर्डे यांच्या हस्ते करण्यात आले.

या स्पर्धेसाठी पंच म्हणून अश्फाक मुलानी, सुर्वेसर, इसकांडे,जांभुळकर, मंडलिक, सौरभ पाटील, शुभम येवले, आकाश लोंढे ,शुभम जगताप ,कृष्णा खराते, ओमकार जोशी, मयूर पाटील, युनिक पटेल, पप्पू काजळे, सुधीर शिवेकर, किरण तळपे, प्रशांत वाघमारे, देव खरटमल, प्रतिभा डबीर, रवी थोरात, अमर बिराजदार, महादेव माळी, गोरख काकडे काम पहिले. या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या खेळाडूंना भूकंप व पुनर्वसन राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे ग्रुपच्या वतीने प्रमाणपत्र मेडल चषक देण्यार असून स्पर्धेमध्ये विजय झालेले खेळाडू जिल्हा पातळीवर मावळ तालुक्याचे नेतृत्व करणार आहेत. या स्पर्धेचे आयोजन मावळ तालुका क्रीडा शिक्षक संघटना व फाउंडेशन यांच्या माध्यमातून करण्यात आली.

स्पर्धेचा निकाल

14 वर्षाखालील मुली
प्रथम क्रमांक- रमेश कुमार सहानी इंग्लिश मीडियम स्कूल
द्वितीय क्रमांक- न्यू इंग्लिश स्कूल चांदखेड
तृतीय क्रमांक- श्रीराम विद्यालय

17 वर्षाखालील मुली
प्रथम क्रमांक- खुर्ची ग्राम प्रबोधनी साळुंब्रे
द्वितीय क्रमांक- रमेश कुमार सहानी इंग्लिश मीडियम स्कूल
तृतीय क्रमांक- न्यू इंग्लिश स्कूल टाकवे

19 वर्षाखालील मुली
प्रथम क्रमांक- इंग्रजी इंद्रायणी महाविद्यालय
द्वितीय क्रमांक- पंडित नेहरू विद्यालय कामशेत

14 वर्षाखालील मुले
प्रथम क्रमांक- गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल
द्वितीय क्रमांक- रमेश कुमार साहनी इंग्लिश मीडियम स्कूल
तृतीय क्रमांक- एसआरटी कामशेत

17 वर्षाखालील मुले
प्रथम क्रमांक- रमेश कुमार सहानी इंग्लिश मीडियम स्कूल
द्वितीय क्रमांक- जीपीएस लोणावळा
तृतीय क्रमांक-न्यू इंग्लिश स्कूल वडगाव

19 वर्षाखालील मुले
प्रथम क्रमांक- इंद्रायणी महाविद्यालय
द्वितीय क्रमांक- बाल विकास महाविद्यालय
तृतीय क्रमांक- एम आय टी कॉलेज तळेगाव

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.