Pune : आर्किटेक्चर विद्यार्थ्यांच्या ‘संवाद ‘ प्रदर्शनाचे उदघाटन

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ‘ च्या वतीने आर्किटेक्चर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या इमारतींच्या डिझाइन्स ,मॉडेल्स चा समावेश असलेल्या ‘संवाद 2019’ या वार्षिक प्रदर्शनाचे उदघाटन ज्येष्ठ वास्तुविशारद विकास भंडारी यांच्या हस्ते 29 ऑगस्ट रोजी सकाळी झाले .

1 सप्टेंबर पर्यंत सहकारनगरच्या बागुल उद्यानातील पंडित भीमसेन जोशी कलादालनात हे प्रदर्शन सकाळी 10 ते 6 या वेळात सुरु राहणार आहे. ‘अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ‘च्या प्राचार्य डॉ. लीना देबनाथ, प्रा .रणजीत घोगले उपस्थित होते.

विकास भंडारी म्हणाले, “वास्तूशास्त्र च्या आधारे घरात ,इमारतीच्या रचनेत बदल करण्याचा आग्रह धरणाऱ्या ग्राहकांचे प्रबोधन वास्तुविशारदानी (आर्किटेकट )करावे.  वास्तुशास्त्राचे नियम सध्याच्या परिस्थितीत अंमलात आणण्याजोगे आहेत का ,हेही पाहावे . वास्तुरचना करताना लँडस्केप आणि हिरवळ जपण्याकडे लक्ष द्यावे . ओपन स्पेस ,मोकळ्या जागांचा मानवी मनावर सकारात्मक परिणाम होतो ,हे ध्यानी घेऊन त्या ठेवाव्यात . आर्किटेकट मंडळींनी सोप्या वास्तुरचना करण्याकडे लक्ष द्यावे ,गुंतागुंतीच्या रचना करू नयेत”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.