Malavali : लोहगड व विसापूर किल्ल्यावर श्रावणी सोमवार निमित्त अभिषेक

एमपीसी न्यूज- लोहगड-विसापूर विकास मंचातर्फे लोहगड विसापूर किल्ल्यावर दरवर्षीप्रमाणे श्रावणी सोमवार निमित्त गडावरील शिवमंदिरात अभिषेकाचे आयोजन करण्यात आले. लोहगडावर गेली 19 वर्षे तसेच विसापूर किल्ल्यावर गेली तीन वर्षे हा उपक्रम चालू आहे.

चौथ्या सोमवारी लोहगड-विसापूर विकास मंचातर्फे या ठिकाणी अभिषेक केला जातो. यावर्षी लोहगडावरील शिवमंदिरात मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे, बसप्पा भंडारी, गणेश उंडे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. तर विसापूर किल्ल्यावर विश्वास दौंडकर, मुकुंद तिकोने, अजय मयेकर, सागर कुंभार यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला.

यावेळी मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे म्हणाले, ” जोपर्यंत शरीर साथ देते तोपर्यंत गडावर येऊन गड संवर्धन आपण केले पाहिजे. आपला गौरवशाली इतिहास आपण जपला पाहिजे” लोहगड-विसापूरला पुन्हा एकदा वैभवशाली करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले. पुरातत्व विभागाकडे सतत पाठपुरावा केल्यामुळे विसापूरवर त्यांच्यामार्फत शिव मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यामुळे महाशिवरात्रीला लोहगडावर आता मोठी यात्रा भरत आहे

,या कार्यक्रमाला शिवदुर्गचे प्रमुख सुनील गायकवाड व राजेंद्र कडू व त्यांचे सहकारी, शिव कल्प फौंडेशनचे कार्यकर्ते तसेच या उपक्रमांमध्ये लोहगड, घेरेवाडी, भाजे, पाटण येथील ग्रामस्थ तसेच तळेगाव, सुदुंबरे, पिंपरी-चिंचवडचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे नियोजन सागर कुंभार, अजय मयेकर, विश्वास दौंडकर, कैलास वाघमारे, बाळू ढाकोल यांनी केले. कार्यक्रमानंतर मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.