Pimpri Corona Update : शहरात आज 112 नवीन रुग्णांची नोंद; 143 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड  शहराच्या विविध भागातील 112 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 143 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 626 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.शहरातील 3 लाख 68 हजार 585 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 681 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 658 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

तर, 23 रुग्ण महापालिका रुग्णालयामध्ये दाखल आहे. आज दिवसभरात 475 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 25 हजार 531 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.