Pimpri: तीन दिवसात आठ जण कोरोनामुक्त, आज एकाला डिस्चार्ज; 112 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात एकीकडे कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असली. तरी, दुसरीकडे रुग्ण कोरोनामुक्त देखील होत आहे. मागील तीन दिवसात आठजण कोरोनामुक्त होऊन ठणठणीत होत घरी गेले आहेत. तर, आज (सोमवारी) आणखी कोरोनामुक्त झालेल्या एकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय आज शहरातील 112 जणांचे रिपोर्ट ‘निगेटीव्ह’ आले आहेत. ही दिलासादायक बाब मानली जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्चपासून कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. 8 एप्रिलपासून तर शहरात दररोज कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा तब्बल 96 वर जाऊन पोहचला आहे. तर, चार जणांचा मृत्यूही झाला आहे. दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण बरेही होत आहेत. शनिवारी तीन, रविवारी चार आणि आज सोमवारी एक असे मागील तीन दिवसात आठ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आजपर्यंत 29 रुग्ण कोरोनामुक्त होत ठणठणीत झाले आहेत. त्यामुळे ही समाधानाची बाब मानली जात आहे. आज कोरोनामुक्त झालेला रुग्ण खराळवाडी परिसरातील रहिवाशी आहे.

आजचा वैद्यकीय अहवाल!
#दाखल झालेले संशयित रुग्ण – 171

# पॉझिटीव्ह रुग्ण – 11

#निगेटीव्ह रुग्ण – 112

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 164

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 219

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 113

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 96

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 69

# शहरातील कोरोना बाधित नऊ रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या –  4

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 29

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 14327

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 43031

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.