Pune : दगडूशेठ गणपतीसाठी 151 किलोचा मोदक

एमपीसी न्यूज- दगडूशेठ गणपतीला तब्बल 151 किलोचा मोदक अर्पण करण्यात आला. वडगाव मावळ येथील जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर यांनी हा मोदक अर्पण केला.

काका हलवाईचे मालक महेंद्र गाडवे व युवराज गाडवे यांनी हा मोदक साकारला आहे. या मोदकाला काजू, बदाम, पिस्ता, बेदाणे यांसह चांदीचा वर्ख लावण्यात आला असून सलग 8 तासांच्या मेहनतीनंतर 15 कारागिरांच्या मदतीने हा मोदक करण्यात आला.

यावेळी उपसरपंच विशाल वहिले, सुनील आबा दंडेल, गणेश पं.ढोरे, अनिल मोहिते, सुहास वायकर, भाऊसाहेब ढोरे, विठ्ठल मोहिते, अक्षय रौंधळ, अक्षय वायकर, सुयश सांगळे, सौरभ वाल्हेकर, सुजित माझिरे, नवनाथ शेळके, सोनु पिंजण, भारत गाडे आदि उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.