Maval : राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला प्रारंभ

एमपीसी न्यूज- भारतीय जनता पक्ष व राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली सोमाटणे फाटा येथील गणपतीचे दर्शन घेऊन जनआशीर्वाद यात्रेला मंगळवारी (दि. 3) प्रारंभ करण्यात आला.  याच जनआशीर्वाद यात्रेतून भाजपाने विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

पवनमावळ पूर्व भागातील गणपती मंडळांचे दर्शन घेतले यावेळी उपस्थित हजारो नागरिकांच्या साक्षीने या जनआशीर्वाद यात्रेचा शुभारंभ झाला. प्रत्येक गावात महिलांनी मोठया संख्येने उपस्थित राहून औक्षण व ढोल ताश्याच्या गजरात स्वागत केले

सोमाटने फाटा येथे गणरायाचे पूजन व दर्शन घेऊन प्रशांत ढोरे, एकनाथराव टिळे, निवृत्तीभाऊ शेटे, माऊली शिंदे भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकारी, मित्र पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या जनआशीर्वाद यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. भाजप तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, एकनाथराव टिळे, निवृत्ती शेटे, माऊली शिंदे, दादा काजळे, गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, संदीप काकडे, अर्जुन पाठारे, पांडुरंग ठाकर, नितीन मराठे, अलका धानिवले, निकिता घोटकुले, संग्राम काकडे, तात्या गराडे, सरचिटणीस, राजेश मुऱ्हे, रामा गोपाळे, यादव सोरटे, सूर्यकांत सोरटे, चिराग खांडगे, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.