Pimpri News : मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी भक्तांकडून 1125 युनिट रक्तदान

एमपीसी न्यूज – निरंकारी सदगुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या असीम कृपाशीर्वादाने रविवारी (दि.24) संत निरंकारी मिशन पुणे झोनच्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन, काळेवाडी पिंपरी येथे 815 आणि संत निरंकारी सत्संग भवन, पेरणे-फाटा येथे 310 असे एकूण 1125 युनिट रक्त संकलित करण्यात आले. यामध्ये ससून रुग्णालय रक्तपेढी, यशवंतराव चव्हाण रुग्णालय रक्तपेढी, औंध रुग्णालय रक्तपेढी यांनी रक्त संकलित करण्याचे कार्य केले.

या रक्तदान शिबिराचे उदघाटन ताराचंद करमचंदानी (पुणे झोन प्रभारी) यांच्या शुभहस्ते पार पडले. या कार्यक्रमाला  खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार आण्णा बनसोडे, शांतिदूत परिवार प्रमुख विठ्ठल जाधव उपस्थित होते. या रक्तदान शिबिराला अनेक सामाजिक, राजकीय, शासकीय अधिकारी-पदाधिकारी यांनी आवर्जून सदिच्छा भेट दिली.

“मानवतेच्या कार्यासाठी आपले जीवन समर्पित व्हावे, या भावनेने प्रत्येकाने आपले जीवन व्यतीत करावे”, असे उद्गार सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांनी मानव एकता दिनाच्या दिवशी आयोजित या कार्यक्रमात काढले. युगप्रवर्तक सदगुरु बाबा गुरुबचन सिंह जी महाराज यांनी आध्यात्मिक जागृती द्वारा विश्वबंधुत्व तसेच एकत्वचा संदेश संपूर्ण विश्वात पोहोचवला. दरम्यान, सेवेची मूर्ती चाचा प्रताप सिंह जी आणि अन्य भक्तांचे स्मरण करण्यात आले.

संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा व्यतिरिक्त संपूर्ण भारतभर आयोजित केलेल्या 272 रक्तदान शिबिरांमध्ये 50,000 हून अधिक युनिट रक्त संकलन झाल्याची माहिती मंडळाद्वारे देण्यात आली आहे.

रक्तदान शिबिराच्या जनजागृतीसाठी संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनचे स्वयंसेवक तसेच सेवादल यांनी पथनाट्य, रॅली चे आयोजन पिंपरी-काळेवाडी परिसरात केले होते. या कार्यक्रमात आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार पिंपरी सेक्टर प्रमुख गिरधारीलाल मतनानी यांनी मानले.

क्षेत्रीय संचालक, पिंपरी किशनलाल अडवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सेवादलानी आपले योगदान दिले. रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी पुणे झोन मधील संयोजक,मुखी,संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन च्या स्वयंसेवकांनी योगदान दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.