Pune : गणेशोत्सवासाठी पीएमपीएमएलच्या 170 जादा बस

एमपीसी न्यूज- गणेशोत्सवात नागरिकांना देखावे पाहण्यासाठी पीएमपीएमएलकडून 170  जादा बस सोडण्यात येणार आहेत. दि. 5 ते 12 सप्टेंबरदरम्यान या जादा बस धावणार आहेत.

गणेशोत्सवात शहरातील काही प्रमुख रस्ते संध्याकाळी 6 नंतर बंद ठेवण्यात येणार आहेत. प्रामुख्याने शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्त्यावरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. स्वारगेट ते निगडी या मार्गावर रात्रीच्या सुमारास जादा बस सोडण्यात येणार असल्याची, माहिती पीएमपी प्रशासनाने दिली आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान स्वारगेट बसस्थानकातून बस सुटण्याची ठिकाणेही बदलण्यात आली आहेत.

रात्री 10 ते 1 वाजेपर्यंत या जादा बस धावणार असून या सेवेसाठी रात्री दहा नंतर पीएमपीने तिकीट दरामध्ये पाच रुपयांची वाढ केलेली आहे. यामध्ये, पास धारकांना रात्री 12 वाजेपर्यंत सूट देण्यात आली असून त्यानंतर एक तास कोणत्याही प्रकारचे पास चालणार नाहीत.

स्थानक आणि धावणाऱ्या बसेस पुढीलप्रमाणे-

स्वारगेट – धनकवडी, भारती विद्यापीठ, आंबेगाव, अपर इंदिरानगर, पुणे स्टेशन, सांगवी, आळंदी
हडपसर गाडीतळ – स्वारगेट, पुणे स्टेशन, मनपा भवन, सासवड, मांजरी, फुरसुंगी,
मनपा भवन – भोसरी, चिंचवड, निगडी, देहूगांव, विश्रांतवाडी, पाषाण, सुतारवाडी, बालेवाडी, तळेगाव दाभाडे, प्राधिकरण
डेक्कन – कर्वेनगर, माळवाडी, गोखलेनगर, कोथरुड डेपो
सिंहगड रस्ता – वडगाव, धायरी, खानापूर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.