Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 11 अधिका-यांच्या बदल्या; दोघांना नियुक्ती

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 11 पोलीस अधिका-यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. तर दोन पोलीस अधिकारी आयुक्तालयात नव्याने हजर झाले आहेत. त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी बुधवारी (दि. 4) दिले.
राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत. आयुक्तालयातील तीन पोलीस निरीक्षक, दोन सहायक निरीक्षक व सहा उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गडचिरोली येथून पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये दोन पोलीस उपनिरीक्षक यांनाही नियुक्ती देण्यात आली आहे.

बदली झालेले पोलीस अधिकारी –
# पोलीस निरीक्षक नारायण पवार (तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे ते संगणक कक्ष)

# पोलीस निरीक्षक पांडुरंग बाबासाहेब गोफणे (देहूरोड पोलीस ते वाहतूक शाखा)
# पोलीस निरीक्षक भानुदास आण्णासाहेब जाधव (म्हाळुंगे पोलीस चौकी ते पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट 3)
# सहायक निरीक्षक विजय पांडुरंग गरुड (पिंपरी पोलीस ठाणे ते सायबर कक्ष)
# सहाय्यक निरीक्षक चैत्राली सतिश गवळी (सांगवी पोलीस ठाणे ते संगणक कक्ष)
# उपनिरीक्षक रमेश महादेव केंगार (हिंजवडी पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष)
# उपनिरीक्षक प्राची गोरख तोडकर (देहुरोड पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष)
# उपनिरीक्षक फारुख याकुब सयद सोलापुरे (चिखली पोलीस ठाणे ते वाहतूक शाखा)
# उपनिरीक्षक विक्रम पासलकर (चाकण पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष)
# उपनिरीक्षक विजय जगदाळे (चाकण पोलीस ठाणे ते वाहतूक शाखा)
# उपनिरीक्षक सोमनाथ बापूराव हंडाळ (भोसरी पोलीस ठाणे ते वाहतूक शाखा)

गडचिरोली येथून बदलून आलेले पोलीस अधिकारी –

# उपनिरीक्षक रामदास बाबूराव जाधव (भोसरी एमआयडीसी)
# उपनिरीक्षक अवधूत महादेव शिंगारे (वाकड)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.