BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : कांतीलाल शाह विद्यालयात शिक्षक दिन साजरा

एमपीसी न्यूज- इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या कांतीलाल शाह विद्यालयात गुरुवार (दि. 5) शिक्षक दिन साजरा करण्यात आला. विद्यालयातील शिक्षकांचा विद्यालय व लायन्स क्लब तळेगावचे वतीने सत्कार करण्यात आला.

शिक्षक हे समाज घडविणेचे व विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार घडविण्याचे काम करीत असतात. त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी शिक्षकांना सन्मान पत्र प्रदान करण्यात आले. या प्रसंगी माजी आमदार कृष्णराव भेगडे, कांतीलाल शाळेचे चेअरमन शैलेश शाह, महेश शाह, संजय साने, किरण देशमुख, सुमन रावत,लायन्स क्लब तळेगावचे अध्यक्ष श्रीराम कुबेर, डॉ. शाळीग्राम भंडारी,अनिता बाळसराफ व इतर मान्यवर उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3