Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात 11 सप्टेंबरपासून प्लास्टिक विरोधात “स्वच्छता ही सेवा ” मोहीम

एमपीसी न्यूज- स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियान अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे प्लास्टीक बंदी जनजागृती, श्रमदान व प्लास्टीक मुक्त दिवाळी उपक्रमाद्वारे केंद्र शासनाच्या निर्देशनानुसार शहरात 11 सप्टेंबर ते 27 ऑक्टोबर 2019 दरम्यान स्वच्छता ही सेवा मोहीम राबविण्यात येणार आहे. महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीच्या निमित्त हे अभियान होणार आहे.

एकदाच वापरल्या जाणा-या प्लास्किच्या वस्तु उदा. ताट, वाटी चमचे, भांडी, कप ग्लास, स्ट्रॉ, हॉटेल्स मधून अन्नपदार्थाच्या पॅकेजींगसाठी वापरले जाणारे लहान मोठे कंटेनर्स, सर्व प्रकारच्या प्लास्टिक बॅग्ज इ. वर बंदी आहे. 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उददेशून केलेल्या भाषणात देशभरातील नागरिकांना अशा एकदाच वापरल्या जाणा-या प्लास्टीकच्या वस्तूंचा वापर थांबवविण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 2 ऑक्टोंबर रोजी 150 व्या जयंतीच्या निमित्त स्वच्छता हि सेवा अभियान राबविण्यात येणार आहे.

व्यक्ती, संघटना, संस्था, शाळा, क्रीडा संकुल, क्लब्स, चित्रपट व नाटयगृहे, औदयोगिक संस्था, हॉल, कार्यालये, धार्मिक संस्था, हॉटेल, दुकानदार, मॉल्स, विक्रेता, केटरर्स, व्यापारी, फेरीवाला, वितरक, वाहतूकदार, सेल्समन, मंडई, उत्पादक, या सर्वाना आवाहन करण्यात येत आहे की, बंदी घालण्यात आलेल्या प्लास्टीक व थर्माकॉल इ. वस्तु, पेट बाटल्या यांचे संकलन करुन सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागात अथवा २ ऑक्टोंबर रोजी क्षेत्रीय कार्यालय व त्यांच्या संकलन केंद्रात जमा कराव्यात. बंदी घातलेले प्लास्टीक /प्लास्टीक वेष्टन प्लास्टिक व थर्माकोलचा वापर इ. आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असून नागरिकांनी प्लास्टीकच्या पिशवी ऐवजी कापडी पिशवीचा वापर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

शहरातील प्लास्टिक हद्दपार करण्यासाठी कोणत्याही व्यावसायिक, व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये प्लास्टिक आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असून, कारावासाच्या शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे. पहिला गुन्हा रु. 5000 दंड, दुसरा गुन्हा रु 10000 दंड व तिसरा गुन्हा यांस रु 25000 दंड व तीन महिने इतक्या मुदतीचा कारावास असा दंड आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.