BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : ‘शिक्षक’ हा भावी पिढीचा शिल्पकार- सुरेश भोईर

एमपीसी न्यूज – शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते असे उद्गार नगरसेवक सुरेश भोईर यांनी काढले. केशवनगर येथील पालिकेच्या शाळेमध्ये शिक्षक दिन साजरा झाला त्यावेळी ते बोलत होते.

आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणून केशवनगर शाळेतील सर्व शिक्षक नेहमी चांगले विद्यार्थी, नागरिक तयार करण्यासाठी धडपडत असतात असे सुरेश भोईर म्हणाले.

यावेळी शाळेतील सर्व शिक्षकांचासुरेश भोईर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरस्वती माध्यमिक विद्यालयात शिक्षकदिन साजरा

दत्तवाडी आकुर्डी येथील नवनगर शिक्षण मंडळ संचालित सरस्वती माध्यमिक विद्यालयात शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला

यावेळी नगरसेविका वैशाली काळभोर, नगरसेवक प्रमोद कुटे, पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे व शिक्षक कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3