Nigdi: डॉ. गजानन एकबोटे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज – इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लबज प्रांत 3234 D2 रिजन 1 व 2 च्या वतीने शिक्षक दिनाच्या निमित्त आयोजित शिक्षक कृतज्ञता सोहळ्यामध्ये प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांना लायन्स जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.

निगडीतील कॅम्प एज्यूकेशन सोसायटीच्या कॅम्पसमध्ये वालचंद संचेती सभागृहात हा सोहळा बुधवारी (दि. 11) सकाळी दहा वाजता होणार आहे. पुरस्काराचे वितरण लायन्सचे प्रांतपाल ओमप्रकाश पेठे यांचे हस्ते होणार आहे. याचबरोबर शहरातील 25 गुणवंत शिक्षकांचा व 5 शैक्षणिक संस्थांचा सन्मान केला जाणार आहे.

यावेळी कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती व लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती लायन्सचे विभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी व विजय आगरवाल यांनी प्रत्रकाद्वारे दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.