Sangvi : गणपती पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – गणपती पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाला तीन जणांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 8) रात्री साडेनऊच्या सुमारास जुनी सांगवी मधील शितोळे पेट्रोल पंपाजवळ घडली.

विजय मधुकर आठवले (वय 28, रा. गणेश खिंड रोड, खैरेवाडी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रोहन शेलार (रा. पुणे) आणि त्याचे दोन साथीदार (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय रविवारी रात्री सांगवी परिसरात गणपती पाहण्यासाठी गेले. जुनी सांगवी येथील गणपती पाहत असताना ते शितोळे पेट्रोल पंपाजवळ आले असता तीन आरोपींनी त्यांना अडवले. आरोपी रोहन याने हातातील लोखंडी कड्याने विजय यांच्या तोंडावर मारले. यामध्ये विजय जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.