BNR-HDR-TOP-Mobile

Pune : सलमानच्या ‘किक 2’ सिनेमामध्ये काम मिळवून देण्याच्या आमिषाने महिलेची फसवणूक

एमपीसी न्यूज- प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याच्या ‘किक २’ या आगामी चित्रपटामध्ये एका महिलेला सहायक अभिनेत्रीची भूमिका; तर तिच्या भावाला सहायक दिग्दर्शकाचे काम देण्याचे आमिष दाखवून एक लाख 82 हजार रुपयांची फसवणूक केली.

या प्रकरणी 44 वर्षीय महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.  वारजे पोलिसांनी हिरल ठक्कर, अमर वुटला यांच्यासह त्यांच्या दोन साथीदारांविरुद्ध आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 15 जून ते 6 ऑगस्ट 2019 दरम्यान घडला.

HB_POST_END_FTR-A2

.