BNR-HDR-TOP-Mobile

Pune : पोलीस आयुक्त कार्यालयातच पोलिसांच्या वाहनांवर ‘नो पार्किंग’ची कारवाई

एमपीसी न्यूज- ‘नो पार्किंग’मध्ये वाहन उभे केल्यास सर्वसामान्य नागरिकावर दंडात्मक कारवाई केली जाते. पण जेंव्हा पोलिसांकडूनच कायदा मोडला जातो तेंव्हा त्यांच्यावर कोण कारवाई करणार ? असा प्रश्न विचारला जातो. या प्रश्नाचे उत्तर आज पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात पाहायला मिळाले. आयुक्त कार्यालयात नो पार्किंगच्या ठिकाणी उभ्या केलेल्या पोलिसांच्याच वाहनांवर वाहतूक विभागाने कारवाई केल्यामुळे सर्वाना कायदा समान असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

HB_POST_END_FTR-A2

.