BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: विधानसभेसाठी शिवसेना सज्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी व चिंचवड या दोन विधानसभा मतदार संघामध्ये शिवसैनिक आपल्या दारी अभियानाच्या माध्यमातून समाजामध्ये विविध क्षेत्रात लोकाभिमुख कार्य करणारे मान्यवर व्यक्ती व सामाजिक संस्था यांच्या गाठी भेटी पिंपरी विधान सभाक्षेत्रात आमदार गौतम चाबुकस्वार व चिंचवड विधानसभाक्षेत्रात गजानन चिंचवडे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आल्या.

प्रत्येक प्रभागात विभागप्रमुख, संघटक, समन्वयक, उपविभाग प्रमुख, उपविभाग संघटक, उपविभाग समन्वयक व चार शाखाप्रमुख अशा प्रकारे महिला व पुरुष अशा 28 पदाधिकाऱ्यांची रचना करून शिवसेनेच्या प्रत्येक प्रभागात शाखा कार्यरत करण्यात आल्या व पहिल्या टप्प्यात चिंचवड विधानसभेतील प्रत्येक प्रभागातील शाखेच्या नामफलकाचे उद्घाटन खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार व जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या नामफलकामध्ये शिव सारथी – भगवा सारथी या हेल्पलाईनचा क्रमांक देण्यात आला आहे. त्या द्वारे विभागप्रमुख नागरिकांच्या तक्रारी व सूचना जाणून घेऊन त्याची पूर्तता करण्यासाठी पाठपुरावा करणार आहेत. शहरप्रमुख योगेश बाबर, शहरसंघटिका उर्मिला काळभोर, विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, प्रमोद कुटे, विधानसभा संघटिका अनिता तुतारे, सरिता साने, युवसेनेचे जितेंद्र ननावरे, विश्वजीत बारणे, अभिजीत गोफण, शर्वरी जळमकर, प्रतीक्षा घुले संतोष सौंदणकर, नगरसेवक निलेश बारणे, अँड सचिन भोसले, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, रेखा दर्शिले आदी पदाधिकारी सहभागी होते. चिंचवड विधानसभेत प्रत्येक शाखाप्रमुखास दहा मतदार याद्यानुसार शिवसेना सभासद नोंदणीची जबाबदारी पुढील पदाधिकाऱ्यांनी पार पडली.

नवनाथ तरस, संतोष तरस, सर्जेराव मारनुरे, बाळासाहेब वाल्हेकर, विशाल गावडे,सचिन चिंचवडे, सुरेश राक्षे, मयूर पवार, सोमनाथ गुजर, हरेश नखाते, प्रदीप दळवी, अंकुश कोळेकर, गोरख पाटील, विजय साने, अमित सुवासे,चेतन शिंदे, राहुल पोंगडे, दीपक ढोरे, प्रकाश घोरपडे, अमित निंबाळकर, रामभाऊ जमखंडी, सुरज बेंद्रे, ललित गायकवाड, आकाश कासलीवाल, राहुल पालांडे, उमेश रजपुत,मंगला भोकरे, विमल जगताप, मिना डेरे, साधना तरस,स्वरूपा खापेकर, नयना होळे, मिरा असवले, उषा आल्हाट, वैशाली काटकर, पल्लवी दांगट, पुष्पा तारू, मनीषा घाडगे, भाग्यश्री म्हस्के, शिल्पा आनपान, शारदा वाघमोडे, कमल गोडांबे, श्वेता कापसे, गंगा पडळघरे, सुधा नाईक यांनी परिश्रम घेतले. पिंपरी चिंचवड शहरात शिवसेनेची प्रभाग निहाय बांधणी सक्षम करून शिवसैनिक आपल्या दारी अभियानाद्वारे संघटना विधानसभेसाठी सज्ज झाली आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like