Alandi : कंपनीच्या गोडाऊनमधून सात लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – कंपनीच्या गोडाऊनचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनमधून 7 लाख 10 हजार 511 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना चिंबळी येथे रविवारी (दि. 15) सकाळी उघडकीस आली.

अविनाश सीताराम बनकर (वय 35, रा. चाकण) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अविनाश यांची नोका फ्रेट कॅरिअर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. चिंबळी येथे कंपनीचे गोडाऊन आहे. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास गोडाऊन कुलूप लावून बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचे शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला. मिंडा कार्पोरेशन कंपनीचे बॉक्समधील दुचाकी मोटारसायकलचे वायरिंग केबल असा एकूण 7 लाख 10 हजार 511 रुपयांचा ऐवज चोरून नेला. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.