Maval : राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते 26 कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ बुधवारी (दि. 18) कामगार व भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, सभापती सुवर्णा कुंभार, उपसभापती जिजाबाई पोटफोडे, अध्यक्ष प्रशांत ढोरे, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, रामदास काकडे,पंचायत समिती सदस्या ज्योती शिंदे, निकिता घोटकुले, सभापती ज्ञानेश्वर दळवी, निवृत्ती शेटे, संदीप भुतडा, बबनराव कालेकर, नामदेव भोसले, गणेश कल्हाटकर, गणेश धानीवले, गणेश ठाकर, एकनाथ पोटफोडे, नामदेव भसे, आर.ओ. देशमुख, प्रांत सुभाष बागडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या विकासकामांमध्ये राज्य महामार्ग क्र. 4 ते अहिरवडे रस्ता करणे , तळेगाव स्टेशन ते आंबी पूल बांधणे, इंदोरी ते भोयरे रस्ता करणे, वडेश्वर ते खांडी रस्ता करणे, कामशेत- चिखलसे रस्ता करणे, सोमाटणे शिवणे कडधे रस्ता करणे, कुरवंडे ते राजमाची रस्ता करणे, पांगळोली ते तुंगार्ली रस्ता करणे, शिरगाव ते गहुंजे रस्ता करणे असा एकूण 26 कोटी 78 लाख रुपयांचा निधी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या विशेष प्रयत्नांतून मंजूर झालेला आहे.

यावेळीएम.आय.डी.सी. टप्पा क्र.4 मधील जमीन मोजणीचा शुभारंभ करण्यात आला आहे, या एम.आय.डी.सी.ला निगडे एम.आय.डी.सी. असे नाव देण्यात येणार आहे. मावळ तालुका हा प्रगती करत असून एक नवीन विकासाची क्रांती या भागामध्ये होणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्याला वाटेल त्यांची जमीन वगळली पाहिजे त्या शेतकऱ्याची जमीन 100 टक्के वगळली जाईल. या ठिकाणी 100 एकर जमिनीवर स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभे करणार असून त्या माध्यमातून चांगले प्रशिक्षण देऊन स्थानिकांना नोकरी देणार असल्याची माहिती बाळा भेगडे यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.