Pimpri : प्लास्टिक वापरणाऱ्या दुकानदारांकडून 25 हजार रुपये दंड वसूल

एमपीसी न्यूज- बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करणाऱ्या पाच दुकानदारांवर कारवाई करून 25 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई ग प्रभाग क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत अशोक सोसायटी काळेवाडी फाटा, तापकीर चौक परिसर याठिकाणी बुधवारी (दि. 18) करण्यात आली.

एकूण 32 दुकानांची तपासणी करून पाच दुकानांवर कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपये प्रमाणे 25 हजार दंड वसूल करण्यात आला व 15 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. एका दुकानदाराने कारवाईस विरोध केला असता संबंधित दुकानदाराला काळेवाडी पोलीस चौकीमधील पोलीस अधिकाऱ्यांच्या सहकार्याने सदरची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

क्षेत्रीय अधिकारी झगडे, सहायक आरोग्य अधिकारी संजय कुलकर्णी, आरोग्य निरीक्षक शेखर निंबाळकर, सुरेश चन्नाल, बाबासाहेब राठोड, सदाशिव पुजारी, सतीश इंगेवाड, अतुल सोनवणे तसेच आरोग्य कर्मचारी प्रशांत पवार, विकास शिंदे, दत्तात्रय ढगे, विनायक बोराडे, शैलेश भोसले, अनिल डोंगरे व वाहनचालक चंद्रसेन बोराटे यांच्या पथकाने ही कारवाई केली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.