Pimpri : अभियंत्यांना कृत्रिम बुध्दीमत्‍ता क्षेत्रात अधिक संधी- प्रा. डॉ. ऑस्‍कर कॅस्‍टिलो

एमपीसी न्यूज- जागतिक स्‍तरावर अभियंत्यांना कृत्रिम बुध्दीमत्‍ता क्षेत्रामध्ये प्रचंड संधी उपलब्‍ध होत आहेत. कृत्रिम बुध्दीमत्‍तेमध्ये ‘फजी’ लॉजिकल सिस्‍टिम कॅमेरा अन्य इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे वापरली जातात. आंतरराष्ट्रीय व्‍यापरामध्ये फजी सिस्‍टिमला चांगली मागणी आहे. तांत्रिक विज्ञानामध्ये विद्यार्थ्यांनी करिअर करण्यासाठी या क्षेत्राचा विचार करावा, असे प्रतिपादन प्रा. डॉ. ऑस्कर कॅस्‍टिलो यांनी केले.

यावेळी पर्सिस्टन्ट सिस्टिमचे उपाध्यक्ष डॉ. आर. व्यंकटेश्वरन, आयईईईचे प्रा. गिरीश खिल्‍लारी, प्रा. मंदार खुर्जेकर, टीसीएसचे मंदार भाटवडेकर, जगदीश चौधरी, पीसीईटीचे विश्वस्त भाईजान काझी, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. अजय फुलंबरकर, समन्वयक प्रा. डॉ. के. राजेश्वरी, प्रा. डॉ. लिना शर्मा, ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट सेलचे डीन डॉ. शितलकुमार रवंदळे, डीन डॉ. निळकंठ चोपडे, डॉ. संजय लकडे, डॉ. शितल भंडारी आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) येथे ‘कॉम्यूटींग, कम्यूनिकेशन कंट्रोल ॲण्ड ॲटोमेशन’ या विषयावरील तीन दिवसांच्या पाचव्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्‍घाटन यूएसए येथील तिजुआना इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजिचे अधिष्ठाता डॉ. ऑस्कर कॅस्टिलो यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. फुलंबरकर म्‍हणाले की, ‘आयसीक्‍युब – 2019’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे हे पाचवे वर्ष आहे. अशा परिषदांमधून विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचे शोधनिबंध अभ्यासण्याची तसेच संशोधक तज्‍ज्ञांचे विचार ऐकण्याची संधी मिळते. या अनुभवाच्‍या शिदोरीवरच विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्याचा पाया असतो. पाचव्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये 461 शोधनिबंध आले होते त्‍यापैकी 200 शोधनिबंध सादर करण्यात येणार आहेत असे डॉ. फुलंबरकर यांनी सांगितले.

या परिषदेचे आयोजन पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, प्राचार्य डॉ. ए. एम. फुलंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. स्वागत प्रा. डॉ. के. राजेश्वरी, सुत्रसंचालन प्रा. अंजली श्रीवास्तव, प्रा. दीपा आबीन यांनी तर आभार प्रा. डॉ. लिना शर्मा यांनी मानले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.