Sangvi : छुप्या कॅमेऱ्याने महिलेचा खासगी व्हिडिओ काढल्याप्रकरणी वकिलासह तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – महिलेने तिच्या संमतीने मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्याचे छुप्या कॅमेऱ्याने तिघांनी चित्रण केले. ते व्हिडीओ सोशल मीडियावर पसरविण्याची धमकी देत महिलेच्या ओळखीतील काही लोकांना व्हिडिओ दाखवून तिच्या मित्राकडे मोठ्या रकमेची मागणी केली. याप्रकरणी एका वकिलासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे निलख येथे घडली.

अॅड. अभिजित सरवटे, मानसी खेर व कॅमेरा बसवण्यासाठी मदत करणा-यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 33 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अॅड. सरवटे याने तसेच त्याची अशील असलेल्या एका महिलेने तिस-या व्यक्तीच्या मदतीने फिर्यादी महिलेच्या बेडरूममध्ये स्पाय कॅमेरा बसविला. त्या कॅमे-याद्वारे खासगी प्रसंगाचे चित्रीकरण केले. त्याचे व्हिडिओ तयार करून हे व्हिडिओ सोशल मीडियावर पसरविण्याची धमकी फिर्यादी महिलेच्या मित्राला दिली.

फिर्यादी महिलेच्या वैयक्तिक जीवनातील खासगी कृत्य चित्रित करून ते पसरवून फिर्यादीच्या ओळखीच्या प्रतिष्ठित लोकांना दाखविले. त्यांनी याबाबत फिर्यादी महिलेला सांगितले. तसेच काढलेले व्हिडिओ सोशल मीडियावर पसरविण्याची धमकी देत फिर्यादी महिलेच्या मित्राकडे आरोपींनी मोठ्या रकमेची मागणी केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.