Pune : येवले चहावर एफडीएची कारवाई

एमपीसी न्यूज – पुणे शहरात लोकप्रिय असलेल्या येवले चहावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करीत चहा पावडर, साखर, चहा मसाला यांचे नमुने आणि सहा लाख रुपयांचा साठा संशयावरुन जप्त केला. कोंढवा वेळेकर नगरयेथील येवले चहाच्या गोडाऊनवर ही कारवाई करण्यात आली.

चहासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात न आल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.

येवले चहा प्यायल्याने आजार होतो अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाकडे आल्यामुळे ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे येवले चहा प्यायल्यामुळे पित्त होत नाही, चहा बनवण्यासाठी मिनरल वॉटरचा  वापर केला जात असल्याचा दावा केला जातो.मात्र या दाव्यामध्ये तथ्य नसल्यामुळे ही जाहिरात ग्राहकांची दिशाभूल करते म्हणून नोटीस बवणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.