Pimpri : राष्ट्रवादीची बंदची हाक, पिंपरी-चिंचवडमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद

एमपीसी न्यूज – शिखर बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने आज (शुक्रवारी) बंदची हाक दिली आहे. या बंदला पिंपरी-चिंचवडमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले जात आहे.

निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकारने कारवाई केल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप आहे. या कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने शहर बंदची हाक दिली आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांकडून व्यापारी, परिसरातील नागरिकांना बंदचे आवाहन केले जात आहे. नागरिकांकडून त्याला काही ठिकाणी प्रतिसाद मिळत असून बंद पाळला जात आहे.

पिंपरी कॅम्प, निगडी, प्राधिकरण, पिंपळेसौदागर, सांगवी, नेहरूनगर, भोसरी, संत तुकारामनगर आदी भागातील दुकाने बंद आहेत. तर काही भागातील दुकाने चालू होती. त्यामुळे बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. शहराच्या विविध भागात राष्ट्रवादीकडून मोर्चा काढण्यात येत आहे. पिंपरीत शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक डब्बू आसवणी, नगरसेविका निकिता कदम, संत तुकारामनगर, वल्लभनगरमध्ये माजी महापौर योगेश बहल, नगरसेविका सुलक्षणा धर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, प्रवक्ते फजल शेख यांनी मोर्चा काढला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.