Chinchwad : मराठवाड्यातील मतदार लक्ष्मण जगताप यांच्या पाठिशी – गोविंद घोळवे

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघात मराठवाड्यातील सुमारे एक लाख मतदार आहेत. हे मतदार भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या पाठिशी राहणार असल्याची ग्वाही भगवानगडाचे सचिव, राज्य मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, शिवसेनेचे राज्य संघटक गोविंद घोळवे यांनी दिली. तसेच आपण स्वत: प्रचार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी आमदार लक्ष्मण जगताप यांना आज (मंगळवारी) जाहीर झाली आहे. घोळवे यांनी जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील घरी जाऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच मराठवाड्यातील मतदार पाठिशी उभे करण्याची ग्वाही दिली.

मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील सुमारे एक लाख मतदार चिंचवड विधानसभा मतदारसंघात वास्तव्यास आहेत. मराठवाड्यातील मतदार लक्ष्मण जगताप यांच्या पाठिशी राहतील. जगताप यांचा विजय निश्चित आहे. मी स्वत: लक्ष्मण जगताप यांचा प्रचार करणार असल्याचे घोळवे यांनी सांगितले. तसेच राज्यात भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.