Hinjawadi : गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून 1 किलो 300 ग्रॅम वजनाचा 30 हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

चेतन बाळासाहेब रोंगे (वय 23, रा. कासारसाई, ता. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार राजन महाडिक यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुंजी गावात चव्हाण मळा चौकात एक तरुण संशयितरित्या थांबला आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून चेतन याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 30 हजार रुपयांचा 1 किलो 300 ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. गांजा जप्त करून चेतन याला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाईसाठी हिंजवडी पोलिसांकडे देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.