Chikhali : स्वाईनफ्लू, डेंग्यू, मलेरिया विषयी सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची जनजागृती फेरी

एमपीसी न्यूज- स्वाईनफ्लू, डेंग्यू, मलेरिया या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी मोरेवस्ती चिखली येथील ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज, शुक्रवारी जनजागृती फेरीकाढली.

साने चौक ते म्हेत्रेवस्ती पर्यंत काढण्यात आलेल्या या फेरीमध्ये आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री मातृत्व योजना तसेच टी बी या विषयावर जनजागृती करण्यात आली. या फेरीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, म्हेत्रेवस्ती दवाखाना येथील डॉ. बच्छाव व दवाखान्यातील कर्मचारी तसेच ४०० विद्यार्थी सहभागी झाले होते. सदर फेरीचे आयोजन अमित सुतार यांनी केले, ‘कोरडा दिवस पाळू डेंग्यू टाळू’ अशा घोषणांनी चिखली परिसर दणाणून गेला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.