Pimpri : महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त शहरात विविध संस्थांचे उपक्रम

एमपीसी न्यूज – देशामध्ये सिंगल यूज प्लास्टिक मुक्तीचा उपक्रम सुरु असून पिंपरी चिंचवड शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या दृष्टीने मोहीम हाती घेतली आहे. 23 जून 2018 पासून महाराष्ट्रामध्ये प्लास्टिक सामग्रीचे उत्पादन, वापर, विक्री व वितरण यावरील बंदी लागू केली. त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने मोहीम सुरू करुन 5 हजार ते 25 हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात आला.प्लास्टिक बंदीच्या मोहिमेमध्ये गेल्या 1 महिन्यात महानगरपालिकेमार्फत सुमारे 20 टन प्लास्टिक आणि 37 लाख इतका दंड वसूल केला आहे अशी माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के अनिल रॉय यांनी दिली आहे.

महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त पंतप्रधानानी केलेल्या आवाहनानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत जागरूकता कार्यक्रम आणि प्लास्टिक संग्रह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानुसार सदर दिवशी 32 प्रभागांमध्ये 37 संकलन केंद्र स्थापन करण्यात आलेली होती. या संकलन केंद्रांमध्ये घरे, संस्था, शाळा व संस्थांकडून प्लास्टिक जमा करण्यासाठी 1.3 लाख नागरिकांनी सहभाग घेतला. या व्यतिरिक्त, महापालिकेच्या 600 शाळांनी 1 सप्टेंबर पासून “प्लास्टिक मुक्त पीसीएमसी” अभियान आणि स्वच्छ भारत अभियानामध्ये उत्साहाने भाग घेतला.

तसेच सर्व शाळांनी १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या कालावधीत “स्वच्छता पंधरवाडा” साजरा केला. त्यामध्ये पोस्टर मेकिंग, निबंध लेखन, रांगोळी स्पर्धा,
स्वच्छता ड्राइव्ह, जागरूकता रॅली, प्रभात फेरी इ. चा समावेश होता. सुमारे १ लाख विद्यार्थ्यांनी स्वच्छता प्रतिज्ञा घेतली. तसेच नागरिकांना स्वच्छता आणि प्लास्टिक बंदी अभियानाचे महत्त्व सांगण्यासाठी विशेष संमेलने आयोजित केली गेली. शहरातील पवना नदीच्या साफसफाई मोहिमेत पिंपरी चिंचवड मधील २०० महाविद्यालयातील तसेच एक हजार एनएसएस च्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. सकाळी ७ ते ११या वेळेत २६ घाटांवर प्लास्टिक कचरा श्रमदानात करण्यात आले असून सुमारे ४० किलो प्लास्टिक गोळा करण्यात आले.

सर्व रेल्वे स्थानक, मोठे जंक्शन (चापेकर चौक) आणि बाजारपेठ (पिंपरी भाजी मार्केट,भोसरी मार्केट) येथे जनजागृती मोहिमेचे आयोजन केले गेले होते, ज्यात लाखों नागरिक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग होता.शहरातील सर्व विशेष मोहिमेमुळे ४ लाख नागरिकांच्या मदतीने सुमारे २.३ टन प्लास्टिक संकलित करण्यात आले. विविध स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक मंच, पोलिस मित्र मंडळे, महाराष्ट्र पोलिस, रेल्वे अधिकारी तसेच टेक महिंद्रा, आयबीएम इत्यादी कॉर्पोरेट संस्थांचे स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले.

शहरातील विविध ठिकाणी पथनाटये घेण्यात आली. मे. बीव्हीजी इंडिया, मे. मारू इकोबाग इत्यादीं संस्थांनी सीएसआर भागीदारीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये प्लास्टिकच्या बदल्यात १ हजार कापडी पिशव्या वितरीत केल्या गेल्या.आयुक्त, सर्व विभाग प्रमुख व सर्व विभागातील इतर अधिका-यांच्या सक्रिय सहभागाने सदर कार्यक्रम यशस्वी झाला.

पिंपरी चिंचवड शहराचे रहिवासी असलेले स्वच्छतादूत चंद्रकांत कुलकर्णी हे पंतप्रधानांना भेटण्यासाठी पिंपरी चिंचवडहून साबरमती आश्रमात गेलेले असून, त्यांच्या प्रयत्नाबाबत पंतप्रधातांनी “मन की बात” भाषणात उल्लेख केलेला आहे. त्यांनी केलेले काम हे शहरासाठी तसेच देशातील सर्व नागरिकांसाठी स्वच्छ भारत लक्ष्य मिळवण्याच्या दिशेने प्रेरणादायी ठरणार आहे .प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत २००९ पासून ५ टीपीडी क्षमतेचे “प्लास्टिक टु फ्युएल” हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. सर्व गोळा करण्यात येणारे प्लास्टिक दररोज मोशी येथील यंत्रणेमध्ये पाठवले जाते.

त्यापासून तयार होणारे तेल हे ऑईल फायर बॉयलर, इनसीनेद्रेटर्म, फर्नेमेस, वीजनिर्मितीसाठी हीजी मेट्म आणि रिफाईंड पेटरोकेमिवल्स उत्पादनासाठी, ऑर्ईल रिफायनरीजसाठी वापरता येत हिंदुस्तान कोका कोला वेव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड (एचसीसीबीपीएल) आणि बीव्हींजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (अंमलवजावणी भागीदार) यांच्या सहकार्याने पिंपरी चिंचवड शहराची निवड यूएनडीपी प्लास्टिक रीसायकलिंग मॅनेजमेंट प्रोग्राम अंतर्गत केली गेली आहे. ज्यामध्ये शाश्वत स्वच्छनेसाठी केंद्र (एकात्मिक कचरा हाताळण्याची सुविधा – ३ टीपीडी) ची स्थापना करण्याची वाव समाविष्ट आहे. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन या कार्यक्रमाअंतर्गत ५०० कचरा वेचकांना छत्री, ग्लोव्हज, पाण्याची बाटली, जाकीट इ. सुरक्षा साधनांचे वाटप करण्यात आले तसेच त्यांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.