Hinjawadi : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

एमपीसी न्यूज- लग्नाच्या आमिष दाखवून एका तरुणाने तब्बल दोन वर्षे महिलेवर अत्याचार केले. ही घटना हिंजवडी येथे घडली.

मुन्ना राम सिंह (वय 34, रा. पॉवर हाऊस, फेज दोन, हिंजवडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नाव आहे. याबाबत ३३ वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०१७ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीमध्ये आरोपी मुन्ना सिंग याने फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून हिंजवडी येथे तिच्यावर वेळी अत्याचार केले. महिला पोलीस उपनिरीक्षक अंगद याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.