BNR-HDR-TOP-Mobile

Chikhali : महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

0

एमपीसी न्यूज – रस्त्यावर उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना शनिवारी (दि. 5) सायंकाळी चिखली येथे घडली.

मंगल माणिक नेवाळे (वय 48, रा. नेवाळे वस्ती, चिखली) यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दुचाकीवरील तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास फिर्यादी मंगल या नेवाळे वस्ती, चिखली येथील रस्त्यावर उभ्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील तीन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र मंगल यांनी मंगळसूत्र पकडून ठेवल्याने ते तुटून त्यापैकी एक तोळा वजनाचा मंगळसूत्राचा तुकडा चोरट्याने चोरून नेला. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मस्के करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3