Chinchwad : जमिनीच्या व्यवहारामध्ये सव्वा कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज- जागेची विक्री करण्यासाठी सव्वा लाख रुपये घेऊन करारनामा करण्यास नकार देत फसवणूक केली. ही घटना एमआयडीसी चिंचवड येथे घडली.

राजेंद्र लक्ष्मण पायगुडे (वय 37, रा. पूर्णानगर, चिखली) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नीरज बलदेव वालिया (वय 68, रा. वालिया इंडस्ट्रीज, चिंचवड), वालिया अग्नि इंडस्ट्रीज प्रा. लि., वीरेंद्र कुमार नागिया (वय 68, क्रॉसविंड सोसायटी, बाणेर, पुणे), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 ऑगस्ट 2016 ते 5 ऑक्‍टोबर 2019 या कालावधीत ही घटना वालिया इंस्ट्रीजमध्ये घडली. वालिया अग्नि इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्यावतीने वीरेंद्र नागिया यांनी कुलमुखत्यारपत्र तयार करून वालिया इंडस्ट्रीजच्या जागेपैकी पाच हजार चौरस फूटाची जागा एक कोटी 27 लाख 50 हजार रुपयांना पायगुडे यांना विकली. पायगुडे यांनी त्या जागेवर बांधकाम करण्यासाठी 90 लाख रुपये खर्च केले. जागेचा विक्री करारनामा तसेच इतर पूर्तता करण्यासाठी पायगुडे यांनी नीरज वालिया यांना सांगितले. मात्र वालिया यांनी सदर जागेत येण्यास मज्जाव करीत आपल्या हस्तकांकरवी पायगुडे यांना धमकावले. एक कोटी 27 लाख 50 हजार रुपये घेऊन करारनामा न करता फसवणूक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.