Talegaon Dabhade : खंडेनवमी निमित्त महापराक्रमी दाभाडे घराण्यातील पुरातन शस्त्रांची सत्यशीलराजे दाभाडे यांनी केली पूजा

एमपीसी न्यूज- ऐतिहासिक महापराक्रमी दाभाडे घराण्यातील पुरातन शस्त्रांची विधिवत पूजन करून खंडेनवमी साजरी करण्यात आली. सरसेनापती दाभाडे घराण्याचे विद्यमान वंशज श्रीमंत सरसेनापती सरदार सत्यशीलराजे दादाराजे दाभाडे यांनी शस्त्रपूजन केले.

अशाच महापराक्रमाची साक्ष देणाऱ्या, मराठ्याचे सरसेनापती खंडेराव दाभाडे, अन् एकमेवाद्वितिय मराठा महिला सेनापती उमाबाईसाहेब दाभाडे यांची जीवनसंगीनी असलेल्या तलावारी बरोबरच दाभाडे घराण्यातील अमोलिक शस्त्रसंपदा ज्यात तलवार, कट्यार, बाण आदी परंपरागत दिव्य शस्त्रांचे विधिवत पूजन सरदार सत्यशीलराजे दादाराजे दाभाडे यांनी आपल्या पारंपरिक वेषभूषेमध्ये केले.

प्राचीन काळापासून आजच्या दिवशी आपली आयुधे अर्थात शस्त्रे पर्जन्यकाळानंतर साफसूफ करून पुजण्याचा दिवस. ज्याचे आधारावर सारे जीवन सुरक्षित दाभाडे घराण्यात शस्त्रपूजन करून खंडेनवमी साजरी केली जाते. शस्त्रांची नियमित सफाई अन् त्या शस्त्रापोटीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा शुभदिन म्हणजे खंडेनवमी.

परंपरेने सांगितल्या जाणाऱ्या कथेनुसार पांडवांनी अज्ञातवासानंतर आजच्या दिनीच आपली शस्त्रे शमीच्या वृक्षावरून खाली उतरवली. शिवकाळात तर आजचा दिवस धरती मोलाचा. कारण दसऱ्याला बाहेर पडून पराक्रम गाजविणारी पुरूष मंडळी आजची रात्रच घरी असणार म्हणून पुन्हा त्यांचे दर्शन घडेल न घडेल या हुरहुरीने महिला मंडळ सचिंत असायचे. या दिवसानंतर सारी शिकार सावजटिपणी करूनच नवे पराक्रम करून नवी मुलुखगिरी करून शिपाई बाण्याचे तरूण बाहेर पडायचे. त्याच्या साठी पराक्रामाला दाही दिशा उघड्या असायच्या. त्यामुळेच दसऱ्यानंतर सदैव पत्नीहूनही मोलाचा साथ देणाऱ्या अन् आपल्या पराक्रमाची ग्वाही कमरेला लटकलेल्या समशेरीने अन् अंगावरच्या जखमांनीच कळायची.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.