Hinjawadi : जमिनीच्या व्यवहारात भामट्याने पाच जणांची केली एक कोटी रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज- जमीन देण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने तब्बल पाच जणांची एक कोटी दोन लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना बाणेर येथे घडली.

या प्रकरणी प्रफूल्ल रावसाहेब रेचे (वय 40, रा. दत्तमंदीर रोड, वाकड) यांनी मंगळवारी (दि. 8) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. के. शब्बीरबाबू अबुबकर किझाक्‍कुम (वय 40, रा. डी. पी. रोड, औंध) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 12 जून 2017 ते 8 ऑक्‍टोबर 2019 या कालावधीत बाणेर येथे घडली. फिर्यादी रेचे यांनी आरोपी किझाक्‍कुम याला जमीन विकत घेण्यासाठी 19 लाख रुपये दिले. मात्र आरोपीने ती जमीन रेचे यांना न देता परस्पर दुसऱ्याच व्यक्‍तीला विकली. अशाच प्रकारे आरोपीने नानासाहेब पंडीत जेवे यांच्याकडून 14 लाख रुपये, प्रकाश व्यंकोबा बिडवाई यांच्याकडून 23 लाख 61 हजार, अमरनाथ विभूते यांच्याकडून 12 लाख 50 हजार रुपये, तरबेज शिंगरे यांच्याकडून 33 लाख 35 हजार 600 रुपये घेतले. अशाप्रकारे आरोपीने पाच जणांची एक कोटी दोन लाख 46 हजार 600 रुपयांची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक अनिरूद्ध गिजे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.