BNR-HDR-TOP-Mobile

Sangvi : घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीस

0

एमपीसी न्यूज- घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेली. ही घटना जुनी सांगवी येथे मंगळवारी (दि. 8) उघडकीस आली.

विजयकुमार झांबर गायकवाड (वय 41, रा. आनंदनगर, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड यांनी आपली एमएच-14-टी-3135 ही दुचाकी सोमवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास पार्क केली होती. मंगळवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास दुचाकी चोरीस गेल्याचे दिसून आले. सांगवी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3