Bhosari : प्रेसमशीनमध्ये सापडून कामगाराची दोन बोटे तुटली

एमपीसी न्यूज- कोणतेही प्रशिक्षण नसताना कामगाराला प्रेस मशिनवर काम करण्यास भाग पाडून त्यांची दोन बोटे तुटण्यास कारणीभूत ठरल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना एमआयडीसी भोसरी येथे घडली.

अमर नंदकिशोर श्रीवास (वय 22, रा. राष्ट्रमाता रमाई सावित्री हौसिंग सोसायटी, निगडी) यांनी सोमवारी (दि. 7) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पर्यवेक्षक दिलीप सिंग व कंपनीचा मालक (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीवास हे भोसरी एमआयडीसीतील एस ब्लॉकमध्ये असलेल्या नम्रता इंडस्ट्रीजमध्ये कामाला होते. त्यांना प्रेस मशीनवर काम करण्याचा कोणताही अनुभव नव्हता तसेच याबाबतचे त्यांनी प्रशिक्षणही घेतले नव्हते. तरीदेखील आरोपींनी आपसांत संगनमत करून श्रीनिवास यांना प्रेस मशिनवर काम करण्यास भाग पाडले. यामुळे 29 एप्रिल 2019 रोजी काम करीत असताना त्यांचा हात प्रेस मशीनमध्ये अडकडून दोन बोटे तुटली. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. पांचाळ याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.