BNR-HDR-TOP-Mobile

New Delhi : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 5 टक्के वाढ

0

एमपीसी न्यूज- केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्के वाढ करून केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल , बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 1 जुलैपासून ही वाढ लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय प्रसारण आणि माहिती मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

या निर्णयामुळे 50 लाख वेतनधारक कर्मचारी आणि 62 लाख निवृत्ती वेतन धारकांना याचा लाभ होणार आहे. चालू आर्थिक वर्षाच्या 1 जुलैपासून हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे 16 हजार कोटी रूपयांचा बोजा सरकारी तिजोरीवर पडणार आहे. आतापर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांना 12 टक्के भत्ता दिला जात होता. त्यात पाच टक्के वाढ करण्यात आल्यामुळे भत्ता 17 टक्के झाला आहे, असेही जावडेकर म्हणाले.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3