BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : बाळा भेगडे यांचा लोणावळा कार्ला परिसरात जोरदार प्रचार

0

एमपीसी न्यूज- मावळ विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय उर्फ बाळा भेगडे यांनी बुधवारी लोणावळा आणि कार्ला परिसरात प्रचारदौरा केला. गावागावात ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. ठिकठिकाणी त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

मावळ भागातील मुंढावरे, टाकवे खु., शिळाटणे, दहिवली, कार्ला, सदापूर, वाकसाई, देवघर, जेवरेवाडी, करंडोली, वरसोली, पांगळोली, कुणे नामा, उढेवाडी, खंडाळा, कुरवंडे, वेहेरगाव आदी गावांना बाळा भेगडे यांनी भेटी दिल्या. गावागावात कोपरा सभा घेऊन शासनाच्या कल्याणकारी योजना जनसामान्यांपर्यत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी. विविध विकासकामांच्या बळावर भाजपच्या पाठीशी लोक साथ देत असल्याचे बाळा भेगडे यांनी सांगितले.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3