Talegaon Dabhade : इंद्रायणी इंग्लिश स्कूलचा शुभम नीरज सिंग यांची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत चमकदार कामगिरी

एमपीसी न्यूज- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र व क्रीडा परिषद पुणे आयोजित जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये श्री बाळासाहेब बाबुराव शेळके एज्युकेशन सोसायटीच्या इंद्रायणी इंग्लिश स्कूलचा शुभम नीरज सिंग याने चमकदार कामगिरी केली. या स्पर्धा तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती येथे झाल्या.

या स्पर्धेमध्ये शुभम नीरज सिंग याने 14 वर्ष वयोगट मुलांच्या गटामध्ये उंच उडी या क्रीडा प्रकारात प्रथम, 80 मीटर अडथळा शर्यतीमध्ये द्वितीय तर लांब उडी या क्रीडा प्रकारांमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. उंच उडी आणि 80 मीटर अडथळा शर्यत या क्रीडा प्रकारासाठी विभागीय स्तरावर त्याची निवड झाली आहे.

या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब शेळके व मुख्याध्यापिका रंजीता थंपी यांनी कौतुक व अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शुभम याला शाळेचे क्रीडा शिक्षक विशाल मोरे व मिटन शिल यांचे मार्गदर्शन मिळाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.