BNR-HDR-TOP-Mobile

Pune : चंद्रकांत पाटील यांचा प्रचारासाठी विनाहेल्मेट बाईक रॅली ; पोलीस कारवाई करणार का ?

0

एमपीसी न्यूज – या ना त्या कारणावरून सतत चर्चेत राहणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारासाठी आज काढण्यात आलेल्या बाईक रॅलीत कार्यकर्ते विनाहेल्मेट गाड्या चालवताना दिसून आले. या अतिउत्साही, सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्त्यांवर पोलीस कारवाई करणार का? याकडे लक्ष लागले आहे.

कर्वे रस्त्यावरून कर्वेनगर भागात ही रॅली काढण्यात आली. यावेळी वाहतूक पोलीस होते, पण त्यांनी काहीही कारवाई केली नाही. आधीच कर्वे रस्ता लहान झाला आहे. या रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू आहे. पावसामुळे खड्डे पडले आहेत. त्यात पाणी साचले आहे. या रॅलीमुळे वाहतूक कोंडी झाली होती. पुणेकरांनी हेल्मेट घालावे, वाहतुकीचे नियम पाळावे, असे आवाहन पुणे शहर पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम करीत असतात. परंतु सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून अशी विनाहेल्मेट रॅली काढली जाते. तेव्हा पोलीस आयुक्त कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

यापूर्वीही गिरीश बापट यांचा उपस्थितत विनाहेल्मेट रॅली काढण्यात आली होती. त्यावेळी ठोस अशी काहीच कारवाई झाली नाही. सामान्य माणसाने मात्र हेल्मेट घातले नाही म्हणून पोलीस हजारो रुपयांचा दंड वसूल करीत असतात. सामान्य व्यक्तीला वेगळा न्याय आणि राजकीय कार्यकर्त्यांना वेगळा न्याय असे का असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3